आपले सहर्ष स्वागत करते.
मौजे वडगाव हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात स्थित एक सुशिक्षित आणि प्रगतीशील महसुली गाव असून, ते कोल्हापूर मुख्य शहरापासून साधारण १२ किमी अंतरावर वसलेले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ३,८१२ असून, येथील साक्षरता दर ८३.४६% इतका उच्च आहे जो राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.
गावात सुमारे ७९९ कुटुंबे वास्तव्यास असून येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय सुपीक जमिनीवरील ऊस व भात शेती, भाजीपाला उत्पादन आणि त्यास पूरक असणारा दुग्धव्यवसाय हा आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) यांच्या काळापासून मराठा साम्राज्याची घोडदळ छावणी म्हणून या परिसराला महत्त्व होते, तर सध्या गावाचा कारभार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामार्फत उत्तम रितीने चालवला जातो
आधुनिक सुविधा, धार्मिक एकोपा आणि शांतताप्रिय ग्रामस्थ ही या गावाची खरी ओळख असून, ते हातकणंगले तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून पुढे येत आहे.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत